गोवा खबर : गोव्यातील टीबीच्या (क्षयरोग) रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी निक्षय पोषण योजनेची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या योजनेतून टीबी रुग्णांना आर्थिक सहाय्य, बँक तपशील संकलन, जिओ-टॅगिंग, तसेच निक्षय पोर्टलवर रुग्णांची कौटुंबिक माहिती अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रुग्णाचा एक्सरे रिपोर्ट अपलोड करून, सर्व पंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
टीबीमुक्त गोवा हे आमचं ध्येय आहे, आणि यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे मंत्री राणे म्हणाले.