गोवा खबर : शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था, गोठण-वेलिंग यांच्यावतीने सरकारी प्राथमिक विद्यालय, गावठण-वेलिंग तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय, खाजन-वेलिंग येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅग्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रेरित करणे व त्यांच्या अभ्यासात अधिक रुची निर्माण करणे हाच होता. शाळेसाठी आवश्यक असलेल्या बॅग्सचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे पालकांवरील आर्थिक बोजाही काही प्रमाणात कमी होऊ शकणार.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रोहन वेलिंगकर तसेच कार्यकारी समितीतील सदस्य व काही जेष्ठ सदस्य उपस्थित होते. मागील वर्षांमध्येही विद्यार्थ्यांना पुस्तकं व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत सक्रिय आहे. समाजहितासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविले जातील, असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.