गोवा खबर

वेदांताच्या मदतीमुळे ५०,००० चौरस मीटर शेतीला होणार फायदा

Published

on

Spread the love

गोवा खबर : वेदांता सेसा गोवा, मूल्यवर्धित सेवेने (व्हीएबी) त्यांची भागीदार स्वयंसेवी संस्था वनराईच्या सहकार्याने, उच्च दर्जाची भात बियाणी वितरीत करून आमोणा येथील ब्रम्हेश्वर शेतकरी संघटनेला मदत केली आहे. यातून सुमारे ३५ शेतकऱ्यांना फायदा होणार असून इनपुट खर्च कमी होईल आणि आमोणा येथील सुमारे ५०,००० चौरस मीटर भातशेतीमध्ये पीकाचे उत्पादन वाढेल.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एक माहितीपूर्ण जागरूकता सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. वनराईतील लक्ष्मण खरवत यांनी भातशेतीतील सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती दिली, ज्यामध्ये राईस इन्टेंसिफिकेशन प्रणाली (एसआरआय) पद्धत, बियाणे प्रक्रिया आणि प्रभावी कीटक व तण व्यवस्थापन तंत्राचा समावेश आहे.

व्हीएबीचे सीईओ सप्तेश सरदेसाई म्हणाले, वेदांता सेसा गोवा मूल्यवर्धित सेवा येथे आम्ही प्रकल्प ग्राम निर्माण अंतर्गत, शेतकरी समुदायाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. भात उत्पादक शेतकऱ्यांना आमची मदत, ही कृषी लवचिकता आणि ग्रामीण समृद्धी वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, जी संपूर्ण गोव्यात भात शेती मजबूत करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

प्रकल्प ग्राम निर्माण अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात ब्रम्हेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदेश नाईक व आमोणातील स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, ब्रम्हेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदेश नाईक म्हणाले, आम्ही ब्रम्हेश्वर शेतकरी संघटना, वेदांता सेसा गोवा आणि वनराई यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेले भात बियाणे आणि मार्गदर्शन हे लागवडीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करेल आणि या परिसरातील अधिक शेतकऱ्यांना भातशेती करण्यास प्रोत्साहित करेल.

Trending

Exit mobile version