गोवा खबर

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी प्रश्न पाठवा : आम आदमी पार्टीच्या आमदारांचे गोमंतकीयांना आवाहन 

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै पासून सुरू होणार असून, या अधिवेशनासाठी प्रश्न पाठवण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे (आप पार्टी) बाणावलीचे आमदार कॅ. व्हेंझी व्हीएगस व वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी बाणावली व वेळ्ळी मतदारसंघातील जनता तसेच गोमंतकीयांना केले आहे. 28 जून पर्यंत हे प्रश्न घालणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांकडे असलेली पर्सनल, दक्षता, सामान्य प्रशासन, शिक्षण, नियोजन आणि सांख्यिकी, माहिती आणि प्रसिद्धी, लिगल मेट्रोलोजी, कौशल्य विकास, उद्योजकता विकास या खात्यांचे प्रश्न, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे असलेल्या वीज, अक्षय उर्जा, गृहनिर्माण व गृहनिर्माण बोर्ड या खात्यांचे प्रश्न, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडील समाज कल्याण खाते, नदी परिवहन, संग्रहण व पुरातत्व खाते, अपंगत्वांचे सक्षमीकरण या खात्यांचे प्रश्न घालण्यात येणार असल्याची माहिती आमदार व्हेंझी व्हीएगस यांनी दिली.

अन्य खात्यांचे ही प्रश्न घालण्यात येणार आहेत. त्यासाठी गोमंतकीय जनता, माजी सरकारी अधिकारी, कर्मचारी, विद्यमान सरकारी अधिकारी, कर्मचारी, माहिती हक्क कार्यकर्ते यांनी ही आपले प्रश्न पाठवावेत असे आवाहन आमदार व्हेंझी व्हीएगस यांनी केले. माहिती हक्क कार्यकर्त्यांनी ही आपले प्रश्न पाठवल्यास विधानसभागृहातून माहिती मिळवणे सुलभ होणार आहे. आप पार्टीचे दोन आमदार असले तरी गोमंतकीय व गोमंतकीयांचे आवाज बनून कार्यरत राहणार असून, विधानसभेत ही गोमंतकीयांचा आवाज बनून प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही ही आमदार व्हेंझी व्हीएगस व आमदार क्रुझ सिल्वा यांनी दिली.

Trending

Exit mobile version