गोवा खबर

चोडण धक्क्यावर फेरीबोट बुडाली; जीवितहानी नाही, तीन दुचाकी पाण्यात

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोव्यामधील चोडण ते रायबंदर दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी एक फेरीबोट आज सकाळी चोडण धक्क्यावर बुडाल्याची घटना घडली. आत फेरीबोटीतील कर्मचारी आणि त्यांच्या ताब्यातील तीन दुचाकी होत्या. या तिन्ही दुचाकी पाण्यात बुडाल्या. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

योग्य दिशेने पार्क न केल्यामुळे फेरीबोटीत पाणी शिरून ती बुडाल्याचा नदी परिवहन खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाने पंपांच्या मदतीने बोटीत साचलेले पाणी काढण्याचे आणि बोट पुन्हा फ्लोट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नदी परिवहन खात्याने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनंदिन प्रवासासाठी चोडण-रायबंदर फेरीमार्गाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांसाठी नदी परिवहन खात्याने एकूण पाच फेरीबोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी आज दुर्घटनाग्रस्त झालेल्या फेरीबोट वगळता उर्वरित चार बोटी सुरळीतपणे कार्यरत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा वाहतुकीत फारसा अडथळा झाला नाही.

Trending

Exit mobile version