गोवा खबर : मंत्रिमंडळात बदल झालेच पाहिजेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मांडले. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे किंवा वगळायचे हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्या निर्णयासाठी ते विविध निकष वापरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामगिरी, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कार्य हे बदलांचे निकष असू शकतात. पक्षाचा दृष्टिकोन बदलासाठी सकारात्मक आहे आणि नवीन लोकांना संधी देणे हाही उद्देश आहे, असे नाईक म्हणाले. तसेच इतर पक्षांतून येणाऱ्यांनी भाजपच्या शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी बजावले.
पक्षसंघटना सशक्त असल्याचे सांगताना नाईक यांनी सांगितले, प्रदेश समिती प्रभावी असून नियोजनबद्ध मेळावे घेतले जात आहेत. भाजप सध्या सर्व ४० मतदारसंघांमध्ये आपली संघटना मजबूत करत असून, इतर पक्षांच्या विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.