गोवा खबर : प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यात अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. माजी सभापती व प्रियोळचे माजी आमदार अॅड. विश्वास सतरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर, चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर आणि ग्लेन टिकलो यांनाही पक्षात महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.