गोवा खबर

दूधसागर धबधब्यावर मान्सून ट्रेकिंगला सुरूवात

Published

on

Spread the love

गोवा खबर : जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांसाठी पावसाळी ट्रेकिंगला बुधवारी अधिकृतपणे सुरुवात झाली. गोवा पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग व वन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आमदार गणेश गावकर, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सिद्धेश नाईक, सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते. ट्रेकिंगच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गावकर म्हणाले, हा उपक्रम केवळ साहसी पर्यटनापुरता मर्यादित नसून पर्यावरणप्रेमाला प्रोत्साहन देणारा आहे.

यामुळे स्थानिक गाईड व वनखात्याचे कर्मचारी यांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यापलिकडील गोव्याचा अनुभव घेता येईल, तसेच दुर्लक्षित पर्यटन स्थळे प्रकाशझोतात येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Trending

Exit mobile version