गोवा खबर

पर्वरीतील १०/१२वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना पर्वरी रायझिंगतर्फे उद्या गौरविणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा शालांत मंडळाने मार्च-एप्रिल २०२५ मध्ये घेतलेल्या १०वी व १२वीच्या परिक्षेतील, पर्वरी मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांना पर्वरी रायझिंगतर्फे रविवार 21 जून रोजी गौरविण्यात येणार आहे. पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मंत्री रोहन खंवटे सत्कार सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील.

 या सोहळ्यात शिक्षण खात्याचे उप संचालक मनोज सावईकर प्रमुख वक्ते या नात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. हा सोहळा सुकूर पंचायत सभागृहात 21 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल.

पर्वरी रायझिंग ट्रस्ट समाजाच्या भल्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करत असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा त्यापैकीच एक आहे. यश संपादन करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने दरवर्षी हा सत्कार सोहळा आयोजित केला जातो.

दहावी व बारावीच्या परिक्षेत ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. किर्तीवंत विद्यार्थ्यांचा गौरव करतानाच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी असा सोहळा आयोजित करण्यात येतो. पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार खंवटे यांनी या उपक्रमाची संकल्पना घोषित करून ती प्रत्यक्षात आणली होती.

सुकूर, साल्वादोर द मुंद व पेन्ह द फ्रांक पंचायत क्षेत्रातील १० वी व १२ वीत ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी या सत्कार सोहळ्यासाठी पात्र असतात.

यशवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पर्वरी रायझिंगने केले आहे.

Trending

Exit mobile version