गोवा खबर

गोवा मार्केट अॅक्सेस एक्स्पो २०२५ मध्ये १००+ आशादायी स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांवर भर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात स्टार्टअप परिसंस्थेला पुढे नेण्यासाठी चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईसी) खात्याअंतर्गत असलेल्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलकडून (एसआयटीपीसी) २० जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजल्यापासून ग्रँड बॉलरूम, ग्रँड हयात, बांबोळी येथे गोवा मार्केट अॅक्सेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५चा एक भाग म्हणून या एक्स्पोचे आयोजन केले जात आहे. 

गोव्यात प्रात्यक्षिक उपायांना एक संधी म्हणून हा एक्स्पो एक महत्वाचा गेम चेंजर ठरणार आहे. जो पर्यटन, कचरा व्यवस्थापन, कृषी, सार्वजनिक सेवा, नाबार्ड, आयटीई अँड सी आणि उद्योग या प्रमुख क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान-चालित उपायांसह १००+ शॉर्टलिस्ट केलेल्या स्टार्टअप्सना एकत्र आणणार आहे. या कार्यक्रमात गोव्याच्या स्टार्टअप परिसंस्थेत उद्योजक, गुंतवणूकदार, इन्क्यूबेटर आणि सक्षम बनवणाऱ्यांना, सहकार्य आणि विस्तारासाठी नवीन संधी शोधण्यासाठी, एकत्र जुळण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी खुले आमंत्रण देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री  रोहन खंवटे आणि आमदार तथा इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे ​​अध्यक्ष, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत होईल.

प्रात्यक्षिक प्रकल्पांना सुलभ करून, सरकार-उद्योग सहकार्य मजबूत करणे आणि स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडून त्यातून मूर्त प्रभाव निर्माण करणे, हे या एक्स्पोचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक स्टार्टअपच्या गरजेनुसार आयोजित केलेल्या बैठकींमुळे, संबंधित सरकारी खाते आणि उद्योग भागधारकांचा केंद्रित असा सहभाग सुनिश्चित होईल.

मार्केट अॅक्सेस एक्स्पो २०२५ हे गोवा राज्याला एक पसंतीचे इनोव्हेशन हब बनवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे. जिथे आशादायी कल्पना या बाजारपेठ प्रवेश, विस्तार आणि परिणामासाठी खऱ्या संधींशी जोडल्या जातील.

Trending

Exit mobile version