गोवा खबर

धारगळ दारू प्रकरणावरून काँग्रेसचा इशारा, स्पष्टीकरण न दिल्यास घेराव

Published

on

Spread the love

गोवा खबर : धारगळ येथे कंटेनर ट्रकमधून बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर काँग्रेसने सरकारवर हल्ला चढवला आहे. ट्रकच्या केबिनला लागलेल्या आगीत हे प्रकरण बाहेर आले. मात्र, याप्रकरणी पोलिस व अबकारी खात्याने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या दारूची किंमत सुमारे २ कोटी रुपये असू शकते. या घडामोडीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अबकारी खात्यासमोर घेराव टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आमदार कार्लोस फेरेरा यांनीही या प्रकरणात अबकारी खात्यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच ही बेकायदेशीर वाहतूक शक्य झाली आहे.

Trending

Exit mobile version