गोवा खबर

मणिपाल हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टने दुर्मिळ अशा जायंट प्रोस्टेट केसेसवर केली शस्त्रक्रिया

Published

on

Spread the love

गोवा खबर : प्रोस्टेट्सशी संबंधित आजारांच्य व्यवस्थापनामध्ये आणखी एक क्रांती करत मणिपाल हॉस्पिटल गोव्यातील सिनियर व्हस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. चारुदत्त संभाजी यांनी यशस्वी पणे जायंट प्रोस्टॅटिक हायपरलेशिया (जीपीएच) ने त्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर उपचार केले आहेत. या दोन रुग्णांवर मिनिमली इन्व्हेझिव्ह आणि नॉन सर्जिकल अशा प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बॉयलायझेशन (पीएई) पध्दतीने उपचार करण्यात आले आहेत. 

साधारण प्रोस्टेट्स हे २० ग्रॅम पर्यंतचे असतात आणि त्यांचा आकार हा एका आक्रोड इतका असतो. तर दुसरीकडे जायंट प्रोस्टॅटिक हायपरलेशिया ही एक दुर्मिळ समस्या असून यामध्ये प्रोस्टेट्सचा आकार वाढून त्यांच्या ग्रंथी या २०० ग्रॅम हून अधिक आकारात वाढतात ज्यामुळे लघवी च्या कार्यात अडथळे निर्माण होऊ जगण्याची गुणवत्ता खराब होते.

परंपरागत उपचारांमध्ये अशा प्रकारच्या मोठ्या प्रोस्टेट्स साठी ओपन किंवा रोबोटिक सर्जरी किंवा ट्रान्ससुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट (टीयुआरपी) सारख्या उपचारांची मदत घेतली जाते. यामध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव, लघवीला त्रास होणे, वीर्य बाहेर न पडता ते मुत्राशयात जाणे, रुग्ण बरा होण्यास लागणारा अधिक वेळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात विशेषकरुन अधिक वय असलेल्या किंवा वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांमध्ये अशा समस्या अधिक प्रमाणात जाणवतात.

डॉ. चारुदत्त संभाजी यांना व्हस्क्युलर आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील २१ हून अधिक वर्षांचा अनुभव असून त्यांनी प्रोस्टेटिक आर्टरी एम्बॉयलिझेशन ही अत्याधुनिक इमेज गायडेड प्रक्रिया केली असून यामध्ये प्रोस्टेट्स ना रक्त पुरवठा करणार्‍या निवडक रक्तवाहिन्या अडवल्या जातात ज्यामुळे हळू हळू प्रोस्टेट्स अकुंचन पावतात आणि त्यानंतर लक्षणे कमी होऊ लागतात. ही शस्त्रक्रिया ओटीपोटात किंवा मनगटात एक छोटे भोक पाडून लोकल ॲनस्थेशिया देऊन केली जाते, ज्यामुळे जनरल ॲनेस्थेशिया किंवा कोणतीही मोठी जखम करण्याची गरज नसते.

डॉ. चारुदत्त संभाजी यांनी सांगितले “ दोन्ही रुग्णांच्या प्रोस्टेट्सचा आकार हा २०० ग्रॅम पेक्षा अधिक होता आणि दोघेही मोठी शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते. पीएई केल्यानंतर दोघांच्या लक्षणांमध्ये मोठी सुधारणा दिसून येत असून त्यांनी काहीच दिवसात त्यांचे सर्वसामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.”

टीयूआरपीच्या तुलनेत प्रोस्टेटिक आर्टरी एम्बॉलायझेशनचे खालील महत्त्‍वपूर्ण फायदे आहेत :

– मिनिमली इन्व्हेझिव्ह लोकल ॲनेस्थेशियामध्ये सुध्दा करता येते.

– रक्तस्त्राव होण्याचा कमीत कमी धोका असतो.

– लैंगिक आणि लघवीची कार्यक्षमता टिकून राहते. ‍‍

– अगदी थोडे दिवस हॉस्पिटल मध्ये रहावे लागते व वेगाने बरे होता येते.

यशस्वी उपचार घेतल्या नंतर बरा झालेल्या ७२ वर्षीय रुग्णाने फोनवरुन फॉलोअप विषयी चर्चा करतांना सां‍गितले “अगदी सात दिवसात माझे नियमीत जीवन सुरु झाले. आता अनेक वर्षांनतर मला नीट लघवीला होते आहे. मी पूर्ण बरा झालो आहे आणि आता मुत्राशय पूर्ण रिकामे होत असल्याने चांगले वाटते. या उपचारांमुळे सर्जरी न करता सुध्दा माझ्या जीवनात चांगला बदल घडला आहे.”

प्रोस्टेटिक आर्टरी एम्बॉलिझेशन हा एक नवीन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी क्षेत्रातील उपाय असून त्याला जागतिक स्तरावरुन मान्यता मिळत आहे. या दोन आव्हानात्मक केसेसवरील यशस्वी उपचारांमुळे अत्याधुनिक, नॉन सर्जिकल उपाय अगदी जटील अशा युरोलॉजिकल पध्दतींमध्ये सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आघाडीवर असलेल्या मणिपाल हॉस्पिटल गोव्याने आपला ठसा उमटवला आहे.

Trending

Exit mobile version