गोवा खबर : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीने आयोजित परिषदेत ‘गोवा @2037’ व्हिजन रिपोर्टचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या अहवालात राज्यात 2030 पर्यंत 15,000 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक आणि 1 लाख कुशल रोजगारांची संधी असल्याचे नमूद आहे.
हा अहवाल गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून पर्यटन, नवोन्मेष, शाश्वतता, पायाभूत सुविधा यावर लक्ष केंद्रित केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी चेंबरच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की सरकारही डिसेंबरपर्यंत आपला स्वतंत्र व्हिजन डॉक्युमेंट तयार करेल आणि या अहवालाचा उपयोग होईल.