गोवा खबर

डिझाईन आणि विकासाचा पुनर्विचार करण्यास गोव्यातील सर्जनशील समुदाय एकत्रित

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरामाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे गोवा राज्य आता हळूहळू कल्पना, नवोन्मेष आणि सर्जनशील उद्योगांना समर्थन देणारे स्थळ म्हणून रूपांतरित होत आहे. शाश्वत डिझाइन, सामुदाय सहभाग आणि गोव्याच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘फर्स्ट फ्रायडे’ बैठकीच्या १३व्या आवृत्तीत हे प्रामुख्याने दिसून आले.

क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवातर्फे (सीसीजी) असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) गोवा चॅप्टरच्या सहकार्याने, गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलच्या पाठींब्याने जीसीसीआय येथील सुरेंद्रबाबू तिंबलो हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमात मुख्य सत्राचे नेतृत्व आर्किटेक्ट आणि डिझायनर दीक्षा थिंड यांनी केले. त्यांनी पर्माकल्चर आणि डिझाइनवर मार्गदर्शन केले. “पर्माकल्चर ही केवळ एक पद्धत नसून ती विचार करण्याची प्रणाली आहे,” असे त्या म्हणाल्या. “हे निसर्गाशी जुळवून घेण्याबद्दल आहे, जिथे प्रत्येक घटकाची भूमिका असते. यात संसाधनांचा आदर केला जातो आणि त्याचा पुनर्वापर केला जातो. गोव्याने नेहमीच सर्जनशील मनांना आकर्षित केले आहे, परंतु काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करणे हे ठिकाण आणि लोकांना समजून घेण्यापासून सुरू होते.”

गोव्यातील सराया इको स्टेजच्या संस्थापक, थिंड यांनी स्थानिक साहित्य, समुदाय सहभाग आणि शाश्वत जीवन यातून त्यांच्या पद्धती कशा आकार घेतात, हे सांगितले. “सराया येथे, आम्ही लँडस्केपच्या विरोधात नाही तर त्याच्यासोबत काम करतो. ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

त्यानंतर, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ डी. एस. प्रशांत यांनी गोव्यासाठी डिझाइन केलेल्या धोरणाचा मसुदा सादर केला. “सर्जनशील व्यावसायिकांसाठी गोव्याला एक आवडीचे गंतव्यस्थान म्हणून स्थान देण्याचा यामागील हेतू आहे. एक असे ठिकाण, जिथे कल्पना आपले मूळ धरू शकतात आणि वाढू शकतात,” असे ते म्हणाले. त्यांनी या धोरणाचे वर्णन करताना सांगितले, कि शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करून डिझाइन, हस्तकला, ​​तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामधील प्रयत्नांना संरेखित करण्यासाठी ही एक चौकट आहे.

डिझाइन केलेल्या धोरण मसुद्यावर खुल्या चर्चेत उपस्थितांकडून अभिप्राय मागवण्यात आले, ज्यामध्ये सर्जनशील क्षेत्र आणि स्थानिक समुदाय, शिक्षण आणि उद्योग यांच्यात मजबूत दुवे निर्माण करण्याच्या सूचनांचा समावेश होता.

गोवा आपल्या सांस्कृतिक आणि सर्जनशील संपत्तीवर भर देत असताना, फर्स्ट फ्रायडे सारखे कार्यक्रम राज्यासाठी अधिक डिझाइन-जागरूक आणि समावेशक भविष्य घडविणासाठी वाढते स्वारस्य प्रतिबिंबित करते.

Trending

Exit mobile version