गोवा खबर

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात मंत्र्यांची भागीदारी; फोंड्यात वृक्षारोपण

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यावरण दिनानिमित्त फोंडा नगरपालिकेच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काम करत असताना अनेक टीका आणि अडथळे येतात, मात्र समाजाच्या हितासाठी झटत राहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे कौतुक करत निसर्ग आणि मातेबद्दल आपुलकी जोपासण्याचे आवाहन केले.

फोंडा नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवे राहावे यासाठी पालिकेच्या वतीने सतत विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Trending

Exit mobile version