गोवा खबर

‘प्रोजेक्ट परिवर्तन’मुळे इस्पितळातील संसर्गावर लगाम

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारने इस्पितळांतील संसर्ग टाळण्यासाठी ‘प्रोजेक्ट परिवर्तन’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. फायझर इंडिया व अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन यांच्यासोबत चार वर्षांचा करार करून आरोग्य खात्याने राज्यभरातील ४१ शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स रोखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, या भागीदारीद्वारे गोव्यातील रुग्णालयांमध्ये संसर्ग नियंत्रणासाठी धोरणात्मक उपाययोजना राबवली जातील. रुग्णांची सुरक्षा, उपचारांची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी हा उपक्रम एक आदर्श ठरेल.

या उपक्रमांतर्गत अँटीबायोटिक प्रतिकारशक्तीबाबत निरीक्षणासाठी यंत्रणा उभारली जाणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन होणार आहे. सुरक्षित आरोग्य सेवा हेच ‘प्रोजेक्ट परिवर्तन’चे उद्दिष्ट आहे.

Trending

Exit mobile version