गोवा खबर : कामगार आणि रोजगार खात्याच्या कामगार कल्याण केंद्रांमार्फत राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येणाऱ्या दहा महिन्याच्या भरतकाम, सुईकाम, कटिंग आणि टेलरिंग या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत. १ जुलै २०२५ रोजी पासून अभ्यासक्रमास सुरवात होईल.
प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या मुलांना आणि अवलंबितांना जवळच्या कामगार कल्याण केंद्रांमध्ये अर्ज करण्याची विनंती केली आहे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या कामगार कल्याण केंद्रावर संपर्क करावा.
कामगार कल्याण केंद्र, कामगार निरीक्षक कार्यालय, सरकारी कार्यालय प्रकल्प, पेडणे, कामगार कल्याण केंद्र, नंदकुमार तोरस्कर परबवाडो तोरसे, पेडणे, कामगार कल्याण केंद्र, टाऊन सेंटर कॉम्प्लेक्स, दुसरा मजला डिचोली, कामगार कल्याण केंद्र, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कार्यालय प्रकल्प फोंडा, कामगार कल्याण केंद्र, उपआयुक्त कार्यालय ब्लेसिंग पायोनियरिंग कमर्शियल प्रकल्प, जिल्हा सत्र न्यायालयासमोर, जुने बाजार, मडगाव, कामगार कल्याण केंद्र, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, दुरादो इमारत, वास्को, कामगार कल्याण केंद्र, बाणावली, कामगार कल्याण केंद्र, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, वाडे, कुर्डी, सांगे येथील केंद्रांवर संपर्क करावा.
अधिक माहितीसाठी आयुक्त, कामगार आणि रोजगार कार्यालय, कामत टॉवर, ७ वा मजला, पाटो प्लाझा, पणजी, संपर्क क्रमांक ९५११२५८९०७ येथे संपर्क साधावा.