गोवा खबर

मच्छिमारी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : मत्स्योध्योग संचालनालयाने  जुने गोवा येथील एला धावजी येथील मच्छीमार प्रशिक्षण केंद्रात १ जुलैपासून सुरू होणाऱ्या सहा महिने कालावधीच्या मच्छिमारी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत.

या अभ्यासक्रमात मासेमारी हस्तकला आणि उपकरणे, नेव्हिगेशन आणि सीमनशिपची मूलभूत तत्त्वे, आणि मरीन डिझेल इंजिनची देखभाल आणि ऑपरेशन, आधुनिक जाळी विणणे, सीफूड मूल्यवर्धन आणि मार्केटिंग, मत्स्यपालन आणि मत्स्यालय बनविणे आणि पोहणे या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

किमान आठवी उत्तीर्ण आणि १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार प्रवेशासाठी पात्र आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तसेच समुद्रात अनुभव असलेल्या मासेमारी समुदायातील तरुणांना प्राधान्य दिले जाईल. सदर अभ्यासक्रमासाठी फक्त २० जागा उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना दरमहा १००० रुपये विध्यावेतन आणि दररोज १०० रुपये महागाई भत्ता दिला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी मच्छीमार प्रशिक्षण केंद्र, एला धावजी जुने गोवा किंवा मुख्य कार्यालय, मत्स्योध्योग संचालनालय, पणजी किंवा जवळच्या मत्स्योध्योग संचालनालयाच्या उप-कार्यालयांशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या लँडलाइन क्रमांक ०८३२-२२२४८३८ वर संपर्क साधावा किंवा मत्स्योध्योग अधिक्षक डॉ सुनिता पाऊसकर यांच्या ९८५०७६४५५४ वर संपर्क साधावा किंवा मेकानिकल इन्स्ट्रक्टर सिध्देश केरकर यांच्याशी  ९४२१२४८७९२ वर संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version