गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आपल्या सुंदर गोवा राज्याच्या ३९ व्या घटक राज्य दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

१९ डिसेंबर १९६१ मध्ये गोवा वसाहतवादी राजवटीतून मुक्त झाला. गोव्याला ३० मे १९८७ रोजी घटक राज्याचा दर्जा मिळाल्याने लोकांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न खऱ्या लोकशाही पध्दतीने योग्यरित्या पूर्ण झाले. घटक राज्यामुळे गोव्याला वेगळे व्यक्तिमत्व मिळाले. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी गोव्यातील नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि लोकांनी खूप प्रयत्न केले. या दिवशी गोव्याच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्यांच्या बलिदानाचे स्मरण करतात आणि त्यांचा आदर करतात.

गोवा राज्याने विकासाच्या विविध क्षेत्रात प्रशंसनिय प्रगती साधली आहे. स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम चालीस लावले आहेत. विकसीत गोवा विकसीत भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी आजच्या प्रसंगी एकत्रित प्रयत्न करूया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version