गोवा खबर : गोव्यातील अत्यंत वर्दळीच्या रायबंदर-चोडण जलमार्गावर ‘रो-रो फेरी सेवा’ लवकरच सुरू होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या सेवेचा प्रारंभ अपेक्षित असून चाचण्या सध्या सुरू आहेत.
सेवा वैशिष्ट्ये:
- १५ दुचाक्या आणि २० कार एकाच वेळी वाहून नेण्याची क्षमता
- ५० प्रवाशांसाठी आसन व्यवस्था
- एंट्री व एक्झिट पॉइंट विशेषरित्या तयार
- रायबंदर फेरीधक्क्याचे रुंदीकरण ९ मीटरवरून २६ मीटरपर्यंत
सध्या प्रवाशांमध्ये या सेवेबाबत प्रचंड उत्सुकता असून दररोज कामासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल. शुल्क निश्चिती अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.