गोवा खबर

गोवा विद्यापीठाकडून प्रकल्प सहाय्यक पदासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा विद्यापीठाने “इलेक्ट्रोकेमिकल सिंथेसिस ऑफ एन्व्हायर्नमेंटली बेनाइन कार्बन क्वांटम डॉट्स: अॅप्लिकेशन्स इन हेवी मेटल सेन्सिंग अँड अॅज कॅटॅलिस्ट फॉर मल्टीकम्पोनेंट सिंथेसिस ऑफ एन-बेस्ड हेटेरोसायकल्स” या विषयावरील संशोधन प्रकल्पावर गोवा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात संशोधन करण्यासाठी पात्र प्रकल्प सहाय्यक पदासाठी पात्र उमेदवारांकडून साध्या कागदावर अर्ज मागविले आहेत.

प्रकल्पाचा कालावधी ३ वर्षे असेल. उमेदवाराकडे किमान ५५% गुणांसह सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी असावी. दरमहा २०,००० रुपये शिष्यवृत्ती असेल. वयोमर्यादा ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

इच्छुक उमेदवार ११ जून २०२५ रोजी दुपारी ३-०० वाजता गोवा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात होईल. उमेदवारांनी आपला अर्ज , सीव्ही आणि दाखल्यांच्या प्रतीसह प्राध्यापकांकडे ४ जून २०२५ पर्यंत सादर करावा.

Trending

Exit mobile version