गोवा खबर

सरकारी परीक्षांमध्ये मराठी भाषा डावलल्याचा निषेध

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) लिपिक पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत मराठी भाषेला स्थान न मिळाल्यामुळे मराठी राजभाषा निर्धार समितीने तीव्र निषेध नोंदवला आहे. ही परीक्षा रद्द करून नव्याने मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांमध्ये परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

वेलिंगकर यांनी स्पष्ट केले की, इंग्रजी आणि कोकणी भाषांनाच स्थान दिल्यामुळे मराठी शिकलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. राज्यात शेकडो मराठी शाळा बंद पडत आहेत. सरकारी धोरणामुळे मराठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

या परीक्षेसाठी २० हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मराठी भाषेच्या दृष्टीने ही परीक्षा दु:खद ठरली असून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी ठाम भूमिका समितीने मांडली आहे.

Trending

Exit mobile version