गोवा खबर

आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार प्रकरण : सहा निरीक्षक निलंबित होणार : राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्य खात्यातील सहा अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. या अधिकाऱ्यांमध्ये चार स्वच्छता निरीक्षक आणि दोन आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.

राणे म्हणाले, या अधिकाऱ्यांकडून लोकांची ब्लॅकमेलिंग केली जात होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करत निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात त्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारीसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राणे यांनी ठामपणे सांगितले.

त्याचबरोबर आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडावी. मान्सून जवळ आल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Trending

Exit mobile version