गोवा खबर

छायाचित्रण कला विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला आणि संस्कृती संचालनालयाने १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित केलेली पांच दिवसांची ‘छायाचित्रण कला’ कार्यशाळेचे कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगूण वेळीप यांच्याहस्ते झाले. ही कार्यशाळा बहुउद्देशीय सभागृह, संस्कृती भवन, पाटो येथे २६ ते ३० मेपर्यंत सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालेल. या कार्यशाळेत सुमारे ५० मुलांनी भाग घेतला.

कला आणि संस्कृती संचालक सगूण वेळीप यांनी या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे मुलांना छायाचित्रणाचे ज्ञान देणे असा आहे असे सांगितले. देवाने दिलेल्या निसर्गात रंगांची अमर्याद विविधता आहे, आपल्याला फक्त त्यांचा शोध घ्यायचा आहे असे ते म्हणाले. या छायाचित्रण कार्यशाळेमुळे मुलांचे करिअर घडविण्यासही फायदा होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमात परितोष पै आणि त्यांच्या सहाय्यक रमा पै मुलांना कॅमेरा वापरण्याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील.

यावेळी कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक राजू गावकर, सहाय्यक सांस्कृतिक अधिकारी क्रांती चारी, परितोष पै आणि रमा पै उपस्थित होत्या. सांस्कृतिक अधिकारी रदिमा जोगले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Trending

Exit mobile version