गोवा खबर

उपराष्ट्रपतींहस्ते राजभवन लॉनमध्ये दोन पुतळ्यांचे अनावरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवन येथे स्थापित आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले.

जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनीही यावेळी उपस्थिती लावली. केंद्रीय ऊर्जा आणि नवीनीकरण उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डीसूझा, वीज मंत्री रामकृष्ण ढवळीकर, आमदार आणि इतर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला बोलताना भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतातील सैन दलांनी अलिकडेच भारतीयांना अभिमानित केल्याचे सांगून उपराष्ट्रपतीनी ऑपरेशन सिंदूरने जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की भारत दहशतवाद सहन करणार नाही आणि अशा ऑपरेशनची आवश्यकता होती असे सांगून यामुळे सर्वांना भारताची ताकद समजली आहे असे सांगितले आणि प्रधानमंत्र्यांच्या निर्णयाची त्यांनी प्रशंसा केली.

राज्यपालांच्या समर्पित कार्याचे आणि “बोन्साई गार्डन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वामन वृक्ष कला उद्यानासाठी त्यांचे कौतुक करताना उपराष्ट्रपतीनी अथर्ववेद हा आरोग्य ज्ञानासाठी सोन्याची खाण मानला जातो. प्राचीन भारतीय औषध प्रणालीत आयुर्वेदाला मुख्य आणि महत्वाचे स्थान आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यायी औषधांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि आपल्या प्राचीन वैध्यकिय पध्दतीचा आधार घेऊन नवीन औषधे  तयार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले.

या प्रसंगी बोलताना राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांच्या यात्रेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गोवा ग्राम संपूर्ण यात्रा, सैमिक दायज यात्रा, व्दिप परिचय यात्रा आणि गोवा गिर्यारोहण यात्रा अशा अनेक यात्रा केल्या असून त्याच्या माध्यमातून गोवा राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात भेट देऊन लोकांकडे संपर्क साधला आहे असे सांगितले.

बोन्साय गार्डनबद्दल बोलताना राज्यपालानी राजभवन उध्यानात १००८ प्रकारची झाडे असून लवकरच ते भारतातील सर्वात मोठे उध्यान असेल असे सांगितले. राज्यपालांनी विद्यार्थी बांधवांना, शिक्षकांसह पालकांना राजभवनाच्या लॉनमध्ये उभारलेल्या बागेला भेट देण्याचे आवाहन केले.

राज्यपालांच्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  बोन्साय गार्डनमध्ये १००८ दुर्मिळ जातीची झाडे असणे हा गोवा राजभवनाचा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे असे सांगितले.

राजभवन येथे आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण केल्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी ऋषी सुश्रुत यांची मूर्ती केवळ मेलबर्न येथील प्रसिद्ध रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ सर्जनमध्ये प्रदर्शित केला आहे अशी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आचार्य चरक आणि ऋषी सुश्रुत यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे ज्यात विविध प्रकारचे आजार, औषधी वनस्पती यांचे वर्णन केले आहे.

गोव्याच्या प्रथम महिला रीता पिल्लई, मुख्य सचिव श्री. डॉ. व्ही. काँडावेलू, आयएएस, राज्यपालांचे सचिव संजीव गांवस देसाई आणि इतर उपस्थित होते.

Trending

Exit mobile version