गोवा खबर

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील शिवरायांच्या शस्त्रप्रदर्शनाचा लाभ घ्या : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांच्या प्रदर्शनाचा गोमंतकीयांनी लाभ घ्यावा. असे प्रदर्शन भविष्यात पहायला मिळणे दुर्लभ आहे. हे प्रदर्शन २२ मेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन पाहून ज्ञानात नक्कीच भर पडेल. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, हिंदु राष्ट्रासाठी जे कार्य केले त्याचे पुरावे या प्रदर्शनात आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल सनातन संस्थेचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर व्यक्त केली.

हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, आता पुन्हा तशीच वेळ : दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष, गोवा

 आज येथे सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला आहे. या कार्यात माझेही योगदान असेल. आक्रमणकर्त्यांनी सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ती आजपर्यंत टिकून आहे. हिंदु राष्ट्राचा स्वाभीमान म्हणजे राममंदिर आहे. हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, बलीदान दिले. आता पुन्हा तीच वेळ आली आहे. सर्व संत एकत्र येऊन सनातन राष्ट्र कार्यासाठी पुढे येत आहे, आता आपण दायित्व घेऊन सक्रीय झाले पाहिजे.

सनातन संस्थेने गोव्याला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला : वीजमंत्री सुदिन ढवळीकर

 मला अभिमान आहे की, माझ्याच मतदारसंघात राष्ट्र आणि हिंदु धर्म सांभाळणार्‍या २ संस्था आहेत. सनातन संस्था बांदिवडे पंचायतीमध्ये आहे, दुसरी संस्था कुंडई पंचायतीमध्ये आहे. सनातन संस्थेने आणि प.पू. ब्रह्मेशानंद यांची संस्था या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी गोव्याला वेगळी ओळख करून दिली. राष्ट्र जर पुढे जायचे असेल, तर धर्मातील लोकांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. सनातन संस्था आणि गुरुजींना दैवी बळ दिले. आता आपल्याला एकत्रित हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायचा आहेत.

Trending

Exit mobile version