गोवा खबर : पुढच्या पिढीतील उत्पादन पद्धतीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकताना, भारतातील प्रगत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा पहिला व्यावसायिक वापर गोव्यात सुरू करण्यात आला आहे. निर्मित्सु डिझाइन लॅब्सची प्रगत अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा, थ्रीडी सिस्टीम्सच्या भागीदारीत विकसित करण्यात आली आहे. ही एरोस्पेस, संरक्षण, फाउंड्री आणि टूलिंग उद्योगांसाठी जगातील पहिली थ्रीडी प्रिंटिंग सोल्यूशन्स कंपनी आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि स्वयंपूर्णतेसाठी भारताच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी, गोव्याच्या औद्योगिक वाढीला संरेखित करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे.
माहिती तंत्रज्ञान , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री रोहन खंवटे यांनी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई ; बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर आनंद दिंगणकर ; निर्मित्सु डिझाइन लॅब्सचे सह – संस्थापक राजेश शेठ ; निर्मित्सु डिझाईन लॅब्सचे सह – संस्थापक आणि संचालक इराज शेठ आणि थ्रीडी सिस्टम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप मिनेझिस यांच्या उपस्थितीत या सेवेचे उदघाटन केले .
खंवटे यांचे सक्रिय नेतृत्व भारताच्या उच्च – तंत्रज्ञान नकाशावर गोव्याचे स्थान निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे . विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने , औद्योगिक नवोपक्रम आणि हार्डवेअर परिसंस्थांमध्ये गुंतवणूक वाढवणे शक्य झाले आहे . कार्यक्रमातील विचार व्यक्त करताना त्यांनी सांगितले , की , “ आमचे ध्येय इंडस्ट्री ४ . ० द्वारे आर्थिक वाढीला चालना देणे , रोजगार संधी निर्माण करणे तसेच प्रगत स्टार्टअप आणि आयटी धोरणांसह तुयेमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचा विकास करणे आहे . आम्ही ज्ञान – चालित अर्थव्यवस्था जोपासण्यावर आणि आपल्या राज्यातील प्रतिभा , आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज आहे , याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे . थ्रीडी प्रिंटिंगची ओळख असणे ही भविष्याची झलक आहे . आम्ही शैक्षणिक संस्था आणि संशोधकांना याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो . निर्मित्सुचा इंडस्ट्री ४ . ० मध्ये प्रवेश आणि त्यांच्या तंत्रज्ञान – जाणकार उपक्रमाचा शुभारंभ हा , काय शक्य आहे , याचे एक उत्तम उदाहरण आहे . गोव्याचे भविष्य थ्रीडी प्रिंटिंगद्वारे आकार घेत आहे आणि आम्ही राज्यासाठी चांगले भविष्य घडविण्यासाठी सहकार्य करण्यास उत्सुक आहोत .”
या सुविधेत दोन प्रगत थ्रीडी प्रिंटर होते – इएक्सटी टायटन १०७० पेलेट एक्स्ट्रुजन सिस्टम आणि फिगर ४ स्टॅन्डअलोन रेजिन थ्रीडी प्रिंटर . या अत्याधुनिक प्रणाली उच्च – गती , उच्च – कार्यक्षमता असलेल्या प्लास्टिक आणि संमिश्र भागांची अचूक उत्पादन सक्षम साध्य करतात . याद्वारे एरोस्पेस आणि संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या जटिल मागण्या पूर्ण केल्या जातात .
या प्रणालीचे महत्त्व तंत्रज्ञानाच्या पलीकडे आहे . गोव्यात या सुविधेचा आधार घेऊन , निर्मित्सु डिझाइन लॅब्स नवोपक्रम , रोजगार आणि उद्योजकतेचा एक नवीन औद्योगिक कॉरिडॉर तयार करत आहे . गोव्याच्या तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची ( ईएमसी ) कल्पना अशा पुढील पिढीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी केली आहे , ज्याला सरकारी धोरणे आणि प्रगत उद्योगांसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांद्वारे समर्थित करण्यात आले आहे .
निर्मित्सु डिझाइन लॅब्सचे सह – संस्थापक आणि संचालक इराज शेठ म्हणाले , कि “ आज आम्ही केवळ बांधकाम व्यावसायिकांसाठी दरवाजे उघडले नसून आम्ही उद्देश आणि नवोपक्रमाचे दरवाजे देखील खुले केले आहोत . हे कल्पनांना खऱ्या अर्थाने परिणामात रूपांतरित करण्याबद्दल आहे . आमची सुविधा ही तंत्रज्ञान , डिझाइन आणि उत्पादन हे एकत्रितपणे परिपूर्ण सुसंवाद साधण्यासाठी , काळजीपूर्वक डिझाइन केलेले आहे . या साधनांसह , आम्ही अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतो . आमचे ध्येय प्रगत थ्रीडी प्रिंटिंग सोल्यूशन्सचा जागतिक प्रदाता बनणे आहे , ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतात .”
शाश्वतता , जलद प्रोटोटाइपिंग आणि विकेंद्रित उत्पादनावर लक्ष केंद्रित करून , निर्मित्सुचे उद्दिष्ट मागणीनुसार उत्पादन उपाय सादर करणे आहे . यामुळे पुरवठा साखळी अवलंबित्व कमी होईल आणि नवोपक्रमाला गती मिळेल .
थ्रीडी सिस्टम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप मिनेझीस म्हणाले , कि “ आम्ही निर्मित्सु डिझाइन लॅब्ससोबत त्यांच्या स्टार्टअप अॅप्लिकेशन्सना पुढे नेण्यासाठी पाठिंबा देण्यास , एक सामंजस्य करार केला आहे . हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जिथे आम्ही अर्थपूर्ण योगदान देऊ शकतो . आम्ही हे थ्रीडी प्रिंटर पुरवले आहेत आणि हे कार्य यशस्वीपणे करण्यासाठी एकसंघ होऊन काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत .”
या पुढाकारामुळे गोव्यातील स्टार्टअप्स , एमएसएमई आणि तरुण नवोन्मेषकांना औद्योगिक दर्जाच्या प्रोटोटाइपिंग आणि उत्पादनात , प्रवेश मिळविण्याच्या संधीही खुल्या झाल्या आहेत . एकात्मिक विकास धोरणाचा एक भाग म्हणून उद्योग , नवोन्मेष आणि शिक्षण एकत्रित करण्याच्या गोवा सरकारच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब आहे .
गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात , या लाँचकडे भारताच्या प्रगत उत्पादन आणि आयटी हार्डवेअर परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून पाहत आहे . उच्च – स्तरीय औद्योगिक उत्पादन चालविण्यास आणि नवोन्मेष – नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था सक्षम करण्यात गोवा राज्य एक धोरणात्मक भूमिका बजावत आहे .