गोवा खबर

स्पिरिट ऑफ गोवा महोत्सव सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : स्पिरिट ऑफ गोवा महोत्सव महोत्सव ७ आणि ८ मे २०२५ रोजी कोलवा येथील एसएजी मैदानावर होणार आहे. शिरगाव येथील लइराई जत्रेत घडलेल्या दुःखद घटनेमुळे हा महोत्सव यापूर्वी पुढे ढकलण्यात आला होता.

या महोत्सवात स्थानिक पद्दतीने तयार केलेले स्पिरिट, गोव्याचे पारंपारिक खाद्यपदार्थ, लाईव्ह संगीत, मास्टरक्लास, कला आणि हस्तकला प्रात्यक्षिके तसेच  कुटुंबासाठी अनुकूल उपक्रम व प्रदर्शनाचा अनुभव पर्यटक या ठिकाणी घेऊ शकतात. स्पिरिट ऑफ गोवा महोत्सव सर्वांना गोव्याची परंपरा, चव आणि कलात्मकतेच्या अविस्मरणीय अशा उत्सवाचे सार अनुभवण्यासाठी या महोत्सवात आमंत्रित करत आहे.

Trending

Exit mobile version