गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या अलीकडील सुकाणू बैठकीत महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय घेण्यात आले. चळवळीला अधिक एकवटण्यासाठी आणि संघटित पद्धतीने पुढे नेण्यासाठी, आतापर्यंतची राज्य सुकाणू समिती बरखास्त करून “केंद्रीय मार्गदर्शक मंडळ” आणि “केंद्रीय कार्यकारी मंडळ” अशी द्विस्तरीय रचना स्थापन करण्यात आली आहे.
केंद्रीय मार्गदर्शक मंडळ :
प्रमुख मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय कार्यकारी मंडळ :
या मंडळात नव्या दमाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी समाविष्ट असून मराठी अस्मिता जपण्यासाठी सक्रिय भूमिका घेणार आहेत. या मंडळावर राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि इतर तीन मार्गदर्शक सदस्य पदसिद्ध स्वरूपात राहतील.
हीच संघटनात्मक रचना सर्व १८ प्रखंड आणि ग्रामपंचायत स्तरावरही राबवण्यात येईल. वरिष्ठ मार्गदर्शकांसोबतच तरुण कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन चळवळ बळकट केली जाईल.
– प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य निमंत्रक