गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला प्रसाद-बिसेसर यांचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंधांवर भर दिला.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “निवडणुकीतील विजयाबद्दल @MPKamla यांचे हार्दिक अभिनंदन. त्रिनिदाद आणि टोबॅगोसोबतचे आमचे ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंध आम्ही जपतो. आमच्या जनतेच्या सामायिक समृद्धी आणि कल्याणासाठी आमची भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”