गोवा खबर

कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मार्क कार्नी यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मार्क कार्नी यांचे कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल तसेच लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

भारत आणि कॅनडा दरम्यानची सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याप्रति असलेली अतूट वचनबद्धता आणि एकमेकांना घट्ट जोडून ठेवणारे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील घनिष्ट संबंध त्यांनी अधोरेखित केले.

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे : कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल @MarkJCarney आणि लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन. भारत आणि कॅनडा सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याप्रति दृढ बांधिलकी आणि परस्परांच्या नागरिकांमधील दृढ संबंधांनी बांधलेले आहेत. आपली भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांना अधिक संधी मिळवून देण्यासाठी मी आपल्याबरोबर काम करायला उत्सुक आहे.”

Trending

Exit mobile version