गोवा खबर

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी देशभरात शासकीय दुखवटा 

Published

on

Spread the love

गोवा खबर : परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी अंत्यसंस्कार केले जातील. त्या दिवशी देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. 26 एप्रिल 2025 रोजी, संपूर्ण भारतात राष्ट्रध्वज नियमितपणे फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

भारत सरकारने परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला. 22 एप्रिल आणि 23 एप्रिल  रोजी दोन दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला तसेच अंत्यसंस्काराच्या दिवशी एक दिवसाचा राजकीय शोक पाळला जाईल.

Trending

Exit mobile version