गोवा खबर

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : महसूल सचिव आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप जॅकीस, आयएएस यांनी पर्वरीतील सचिवालयात सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उष्णतेच्या लाटांचा आणि मान्सूनपूर्व तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

जॅकीस आयएएस यांनी येणाऱ्या मान्सून हंगामामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्तकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणानी सक्रिय असण्याची आणि आपत्तीच्या काळात जीव तसेच मालमत्ता वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन तयार ठेवण्याची गरज व्यक्त केली.

उष्णतेच्या लाटेची तयारी आणि शमन उपायांशी संबंधित चर्चा झालेल्या मुद्द्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता मोहिमा, रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या सुविधांना वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, आवश्यक औषधांचा साठा ठेवणे, उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पोर्टेबल पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जंगलातील आगींवर प्रतिबंधात्मक उपाय, राखीव/संरक्षित जंगले, उद्याने आणि अभयारण्यांमध्ये प्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता आणि सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाणी उपलब्ध करणे आणि वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उष्णतेच्या लाटेच्या तयारीकडे लक्ष देणे आणि अपंग व्यक्तींची योग्य काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करणे अशा विषयांवर भर देण्यात आला.

 बैठकीत पावसाळ्याच्या तयारीबद्दल चर्चा करण्यात आली ज्यामध्ये महामार्गांवरील झाडांची छाटणी, धोकादायक झाडे तोडणे, नाल्यांमधून गाळ काढणे, मूलभूत जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणे, सोडलेल्या खाणींची ओळख पटवणे, बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, कमकुवत विद्युत खांबांचा शोध घेणे आणि नवीन बसविणे, पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांची ओळख पटविणे आणि आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर योजना यावर श्री जॅकीस यांनी भर दिला.

 उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधांनी सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जॅकीस यांनी संभाव्य आपत्तीपूर्वी अलर्ट देणारे SACHET मोबाईल अॅप स्थापित करण्याचीही सुचना दिली. बैठकीत नियंत्रण कक्षाचे कामकाज, पूर येण्याचे,आपत्तीच्यावेळी स्थलांतर योजना आणि स्मार्ट सीटीच्या कामाविषयी चर्चा करण्यात आली.

महसूल खात्याचे संयुक्त सचिव सुरेंद्र नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महसूल खात्याचे अवर सचिव संदीप गावडे यांनी हवामानाशी संबंधित आव्हाने कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल सादरीकरण केले.

Trending

Exit mobile version