गोवा खबर

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण 

Published

on

Spread the love

गोवा खबर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत होणार्‍या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण आज ‘गोरक्षपीठ पीठाधीश्वर’ तथा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज यांना देण्यात आले

या वेळी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेजौनपूरमडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल आणि विश्वनाथ कुलकर्णी यांनी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील मुख्यमंत्री कार्यालयात श्रीयोगी आदित्यनाथ महाराज यांची भेट घेतली

या वेळी प्रथम सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आलीसनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज म्हणाले कीसनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहेया कार्याबद्दल तुमचे अभिनंदनसध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेतअधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहेअशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित कराअसा आशीर्वादही त्यांनी या वेळी दिला.

या वेळी ‘सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमातसेच हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री योगी यांना भेट देण्यात आली.

Trending

Exit mobile version