गोवा खबर

गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२४ जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता, पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या प्रशंसनिय योगदानाबद्दल २०२४ सालासाठी गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कारांची घोषणा केली आहे.

या वर्षी हे पुरस्कार पाच श्रेणींमध्ये प्रदान केले जातील. सर्वोत्तम जैवविविधता व्यवस्थापन समिती,  उत्तर आणि दक्षिण प्रत्येकी एक, ५०,०००/- रुपये, वैयक्तिक श्रेणीसाठी उत्तर आणि दक्षिण प्रत्येकी २५,०००/- रुपये, प्रत्येकी एक व्यक्तीसाठी, जैवविविधता उत्साही श्रेणीसाठी उत्तर आणि दक्षिण १५,०००/- रुपये,  व्यावहारिक जैवविविधता संशोधक श्रेणीसाठी २५,०००/- रुपये बक्षीस, हरित पत्रकारिता श्रेणीत २५,०००/- रुपये, तसेच विशेष प्रशंसा पुरस्कार श्रेणीत प्रत्येकी १०,०००/- रुपये बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

 पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: सर्वोत्तम जैवविविधता व्यवस्थापन समिती श्रेणीत पिळगांव जैवविविधता व्यवस्थापन समितीला आणि बांदोडा जैवविविधता व्यवस्थापन समिती तर विशेष श्रेणीत टांदर, केळशी आणि वेर्णा बीएमसी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैयक्तिक श्रेणीत निवृत्त कृषी उपसंचालक विठ्ठल अनंत जोशी, उत्तर गोवा आणि निवृत्त सरकारी कर्मचारी आणि उत्साही फळ उत्पादक  दत्ताराम गोपाळ सरदेसाई, दक्षिण गोवा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कौतुक (वैयक्तिक श्रेणीत) आनंद मेळेकर – मधमाश्या (उत्तर गोवा) आणि श्रीमती लीलावती उसगावकर, नावो पावनो आणि फादर. सिरियाक जेम्स (दक्षिण गोवा) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

 जैवविविधता उत्साही श्रेणीत गोमंतक गौसेवक महासंघाचे अध्यक्ष कमलाकांत सावळो तारी आणि गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सध्या कार्यरत असलेले देवेश नाईक (दक्षिण गोवा) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जहीर करमली आणि डोमिंगो आर्केडिओ फर्नांडिस (उत्तर गोवा) आणि राजेंद्र वेळीप, रॉय बारेटो, नेस्टर फर्नांडिस आणि पियो प्रॅक्सेडीस ज्युलिओ क्वाड्रोस (दक्षिण गोवा) यांना उत्साही श्रेणीतील प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे.

उपयोजित जैवविविधता संशोधक श्रेणीमध्ये – गोपीनाथ विष्णू गावस, मंगिरिश धारवाडकर आणि राहुल कुलकर्णी यांना प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हरित पत्रकारिता श्रेणीत ज्येष्ठ छायाचित्रकार गणेश शंकर शेटकर यांना आणि प्रशंसा श्रेणीत वहाब खान, आरती दास आणि सुभाष महाले यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

बीएमसीचे कामकाज सुलभ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बीएमसी सचिव किंवा अध्यक्ष किंवा सक्रिय सदस्य म्हणून काम करणाऱ्या खालील स्थानिक संस्था सचिवांना विशेष कौतुक (प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्ह, ५०००/- रोख पारितोषिक) दिला जाते. नितीन सावंत (सचिव, नेवरा बीएमसी), अंकिता देसाई (सचिव,कुडतरी बीएमसी), प्रिया आल्मेदा (अध्यक्षा, नावेली बीएमसी), विनय तुबकी (अध्यक्षा, श्रीस्थळ बीएमसी), नंदा माजिक (अध्यक्षा, केरी सत्तरी बीएमसी), युसेबियो ब्रागांझा (सचिव, राय बीएमसी), महेश वायंगणकर (अध्यक्ष, हरमल बीएमसी), अल्विटो डिसिल्वा (अध्यक्ष, पोम्बुर्पा बीएमसी), नरेश शिगांवकर (सदस्य, कुळे बीएमसी), योगीराज गोसावी (फोंडा नगरपालिका), शितिजा नाईक (सचिव, मळकर्णे बीएमसी), देविदास वेळीप (अध्यक्षा, बार्से केपे बीएमसी) यांना जाहीर झाला आहे.

जैवविविधतेच्या क्षेत्रातील योगदानासाठी गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२४ (प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह) साठी विशेष सन्मान दीपक परब, सखाराम परब, विजयंती प्रभुगावकर, अ‍ॅड. शशिकांत नाईक यांना जाहीर झाला आहे.

Trending

Exit mobile version