गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टरच्या शुभप्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ईस्टर येशू ख्रिश्तांच्या गौरवशाली पुनरुत्थानाचा दिवस म्हणून ईस्टर साजरा केला जातो. खरं तर येशू ख्रिश्तांचे पुनरुत्थान हे ईश्वरी असते आणि ख्रिश्ती जीवन आणि श्रद्धेची आशा आणि पाया आहे. ईस्टर हे सर्व वाईट शक्तींवर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक आहे.
येशू ख्रिस्तानी आपल्याला देवावर आणि मानव जातीवर प्रेम करण्याची शिकवण दिली. हा सण आपल्याला बंधुता, प्रेम, करूणा आणि क्षमा यांचा मौल्यवान संदेश देतो. जीवन जगण्यासाठी हे जग एक चांगले ठिकाण बनविण्यासाठी आपण प्रभु येशू ख्रिस्ताच्या आदर्शांचे आचरण करूया.
या वर्षाचा ईस्टर सण गोव्यातील लोकांना शांतता, आनंद, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.