गोवा खबर : गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५साठीच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारत आणि जगभरातून १५० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईअँडसी) खात्यांतर्गतच्या, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलद्वारे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्टार्टअप संस्थापक, विद्यार्थी नवोन्मेषक, उद्योग नेते आणि सरकारी खात्यांकडून या परिसंस्थेमध्ये आकर्षण प्राप्त झाले आहे.
या आव्हानामुळे सरकार आणि उद्योग भागीदारांसोबत थेट प्रात्यक्षिक संधींची दारे खुली झाली आहेत. यात सहभागींना आपल्या उपायांचा स्टरब जाणून घेण्याची आणि पर्यटन, कचरा व्यवस्थापन, कृषी, गोवा सार्वजनिक सेवा, नाबार्ड आणि उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये वास्तविक-जागतिक प्रभाव निर्माण करण्याची संधी मिळेल.
या कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल असून ती जवळ येत आहे. गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज २०२५ हे ३० मे २०२५ रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसह नाविन्यपूर्ण कल्पना तपासून पाहण्याची आणि त्यांचा स्तर मोजण्याची एक अनोखी संधी प्रदान करते.