गोवा खबर

गोवा पर्यटन, ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार २०२५ मध्ये होणार सहभागी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला जयपूर, राजस्थान येथे ४ ते ६ मे या कालावधीत होणाऱ्या ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार (जीआयटीबी) २०२५च्या १४व्या आवृत्तीत आपला सहभाग जाहीर करताना आनंद होत आहे.

राजस्थान सरकार, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित (एफआयसीसीआय), जीआयटीबी हे भारतातील प्रमुख ट्रॅव्हल मार्टपैकी एक आहे. हे आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि प्रमुख उद्योग भागधारकांच्या विस्तृत अशा नेटवर्कला देशाच्या विविध पर्यटन सेवांचे प्रदर्शन दाखविण्यासाठी, सर्वोत्कृष्ट व्यासपीठ म्हणून काम करते.

या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोव्याचा सहभाग हा जागतिक पर्यटन बाजारपेठेत राज्याचा ठसा बळकट करण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. या संधीचा लाभ घेऊन नवीन सहयोग निर्माण करणे, लोकांपर्यंत पोहोचणे, पर्यटनाचा विस्तार करणे आणि गोव्याला वर्षभराचे गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन देणे, हे खात्याचे उद्दिष्ट आहे.

या बझारमध्ये होणाऱ्या बी२बी बैठक, व्यवसाय नेटवर्किंगच्या संधी आणि परस्पर संवादी सत्रांद्वारे गोवा पर्यटन राज्याच्या विकसित पर्यटन परिसंस्थेवर प्रकाश टाकेल. हेरिटेज ट्रेल्स आणि दोलायमान सांस्कृतिक अनुभवांपासून ते निसर्ग आणि वेलनेस पर्यटन, अंतर्गत साहस पर्यटन आणि पुनरुत्पादित पर्यटन उपक्रमांपर्यंत, गोवा पर्यटनाचे दालन राज्याच्या अद्वितीय आणि जबाबदार पर्यटन पद्धतींचे समग्र दृश्य सादर करेल.

या कार्यक्रमाच्या पार्श्ववभूमीवर बोलताना, पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले, कि “जीआयटीबी २०२५ मधील गोव्याचा सहभाग हा राज्याची समृद्ध आणि बहुआयामी ओळख ठळक करण्याची आणखी एक संधी आहे. येथील समुद्रकिनारे जागतिक स्तरावर लोकप्रिय असताना, येथे शोधण्यासारखे आणखीही बरेच काही आहे. येथील दोलायमान सांस्कृतिक परंपरा आणि विशिष्ट सणांपासून ते हिरवागार भूप्रदेश हा पर्यटकांना अर्थपूर्ण, शाश्वत प्रवास अनुभव देतो. जीआयटीबी मधील आमचा यापूर्वीचा प्रवास अनुभव फलदायी ठरला आहे आणि या वर्षीही आम्ही गोव्याला निसर्गरम्य आणि सतत विकसित होणारे गंतव्यस्थान म्हणून प्रदर्शित करून तीच परंपरा पुढे चालू ठेवणार आहोत.”

पर्यटन अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संवाद, नवीन उपक्रमांबद्दल माहिती आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी तयार केलेले प्रवासी अनुभव याठिकाणी घेता येईल अशी अपेक्षा, प्रतिनिधी आणि गोवा दालनाला भेट देणारे अभ्यागत करू शकतात.

गोवा पर्यटन, सर्व प्रवासी व्यावसायिक, खरेदीदार आणि उद्योग भागीदारांना ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बाजार २०२५ मध्ये टीम गोवा दालनाला भेट देण्यासाठी आणि गोव्याला इतर ठिकाणांपासून वेगळे व अनोखे गंतव्यस्थान बनवणाऱ्या अनेक कथा अनुभवण्यासाठी आमंत्रित करते.

Trending

Exit mobile version