गोवा खबर

गोवा विध्यापिठात संशोधन सदस्य पदासाठी मागविलेत अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा विध्यापिठाने विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन संचालनालय, गोवा सरकार पुरस्कृत ‘शाश्वत सेंद्रिय तांदूळ उत्पादनासाठी खाझन जमिनीवर सायनोबॅक्टेरियल जैवखतांचा परिणाम’ या संशोधन प्रकल्पावर काम करण्यासाठी संशोधन सदस्य पदासाठी अर्ज मागविले आहेत.

या पदासाठी आवश्यक पात्रता वनस्पतीशास्त्रात एम.एससी पात्रतासह शैवाल आणि वनस्पतींच्या संवर्धनाचे ज्ञान असले पाहिजे. शिष्यवृतीची रक्कम प्रति व्यक्ती दरमहा रु. १४,०००/- आहे  आणि प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार  ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता गोवा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र शाखेतील जैविक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान शाळेमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

उमेदवारांनी आवश्यक दाखल्यांसह मुख्य संशोधक डॉ. रूपाली भंडारी वनस्पतिशास्त्र शाखा, जैविक विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, गोवा विद्यापीठ ताळगांव पठार, गोवा ४०३२०६ या पत्त्यावर अर्ज लिहावा. उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित छायाप्रती सादर कराव्यात. उमेदवारांनी पडताळणीसाठी त्यांचे मूळ प्रमाणपत्रे सोबत ठेवावीत. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना कोणताही टीए/डीए दिला जाणार नाही.

Trending

Exit mobile version