गोवा खबर

४३ कोटींचे कोकेन जप्त, तिघे अटकेत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राइम ब्रांच) चिकोळणा-बोगमाळो परिसरात मध्यरात्री मोठ्या गुप्त मोहिमेद्वारे केलेल्या कारवाईत तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई राज्यातील अमली पदार्थांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

४.३२५ किलो कोकेनसह तिघांना अटक

चिकोळणा बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री १.५० च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत ४ किलो ३२५ ग्रॅम कोकेन सापडले. आरोपींमध्ये निबू विन्सेंट ऊर्फ विल्सन (४५, वास्को, मूळ कोलकाता), रेश्मा वडेकर आणि मंगेश वडेकर (दोघेही सडा-मुरगाव) यांचा समावेश आहे. तिघांनाही वास्को न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तपास अजून सुरू आहे.

कारवाईत पोलिसांचे पथक सक्रिय

पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर, प्रशाल देसाई, उपनिरीक्षक प्रगती मळीक आणि त्यांचे पथक – नवीन पालयेकर, सैमुल्ला मकानदय, सुजय नाईक, संकल्प नाईक, राहूल नाईक, रोशनी शिरोडकर आणि नितम खोत – यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

केवळ तीन महिन्यांत ५५ कोटींचे ड्रग्स जप्त

गुन्हे शाखेने केवळ २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत ८ वेगवेगळ्या कारवायांमध्ये १९.२३६८ किलो अमली पदार्थ जप्त करत १२ आरोपींना अटक केली असून जप्त केलेल्या ड्रग्सची एकूण किंमत तब्बल ५५ कोटी २७ लाख रुपये आहे.

मुख्यमंत्र्यांकडून गौरव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या यशस्वी कारवाईसाठी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करत, अमली पदार्थांविरोधातील लढ्यात ही कारवाई आमच्या सरकारच्या कठोर आणि ठोस भूमिकेचे प्रतीक आहे, असे मत व्यक्त केले.

Trending

Exit mobile version