गोवा खबर

कमी दर्जाच्या अन्न उत्पादक आणि विक्रेत्यांना दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर : अन्न आणि औषद प्रशासन संचालनालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यानी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याखाली कमी दर्जाचा शेव चिवडा, काजू आणि पालक चकली उत्पादक आणि विक्रेत्यांविरूद्द केलेल्या कारवाईच्या प्रकरणात उत्तर गोवा अतिरीक्त जिल्हा दंडाधिकाऱी तथा न्याय अधिकाऱ्यांनी निवाडा देताना  अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे उत्पादक आणि विक्रेत्यांना दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

कमी दर्जाचा आणि सिंथेटिक कलर वापरून तयार केलेला मिक्स शेव चिवडा उत्पादन आणि विक्री केल्यामुळे दामाजी म्हवळणकर (उत्पादक) आणि मे. महावीर बालाजी स्वीट मार्ट, आल्त पर्वरी यांना १ लाख रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

लेलेस काजू नावाने कमी दर्जाचे काजू उत्पादन आणि विक्री केल्याबद्दल प्रकाश मे. गोवा काजू डेपोचे मालक प्रकाश बिश्णोई आणि जयराम बिश्णोई, उमतावाडो कळंगूट यांना दोन लाख रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

तसेच दुसऱ्या एका कारवाईत कमी दर्जाची पालक चकली उत्पादन आणि विक्री केल्यामुळे मे. जननी फुड प्रॉडक्टस, कुंद्रापूर उडपी, कर्नाटक यांना  २० हजार रूपये  तर प्रभू ट्रेडर्स, बांबोळी आणि मुकेश राजपुरोहित ओम साई जनरल स्टोअर, ताळगाव यांना प्रत्येकी १० हजार रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

Trending

Exit mobile version