गोवा खबर

सातव्या एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सच्या क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदी आभीर बाबा बार्देश

Published

on

Spread the love
गोवा खबर:एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सच्या क्रिकेट स्पर्धेत येथील *आभीर बाबा बार्देश* या संघाने आरव क्रिकेटर्स केपे या संघाला नमवून अजिंक्यपद प्राप्त केले.
एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सतर्फे यावर्षी ही स्पर्धा सलग सातव्यांदा आयोजित केली होती. दर वर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण असे बदल असणारी स्पर्धा असा नावलौकिक त्यांनी प्राप्त केला आहे. यावर्षी ही स्पर्धा केवळ गोव्यापुर्ती मर्यादित नसून ती गोवा सिंधुदुर्ग असा तिचा विस्तार करण्यात आला होता. तरी सर्व सिंधुदुर्ग येथील बलाढ्य संघांना चारी मुंड्या चित करून चारही उपांत्य संघात गोव्याच्याच संघांनी वर्णी लावली होती. त्याचप्रमाणे यावर्षी उत्तम अश्या देवधर लाकडाच्या सहाय्याने सर्व चषक निर्माण करण्यात आले होते. या स्पर्धेत गोव्यातील आजोबा क्रिकेटर्स, सत्तरी व प्रतिका वोरियर्स, पेडणे या संघांनी मजल मारली होती. एस. के. जॉगिंग चॅम्पियन म्हणून अमृत वेर्लेकर याला सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून रजत कुडाळकर याला सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून आल्व्हीनो कार्व्हलो तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोमेश दोडामणि याला मान मिळाला.
यावेळी व्यासपीठावर भारताचे राज्यसभा खासदार व गोव्याचे सुपुत्र श्री. सदानंद शेट तानावडे, या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री. शिवशंकर मयेकर, नागरिक पुरवठा खात्याचे साहाय्यक निर्देशक श्री. तुलसीदास दाभोळकर, काणका पंचायतिच्या सरपंचा सौ. आरती च्यारी, एस. के. जॉगिंग क्रिकेटर्सचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर व इतर उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे नाणेफेक म्हापसा मतदार संघाचे आदरणीय आमदार श्री. जोशुआ डिसौझा यांच्या हस्ते झाले. तसेच सदर स्पर्धा उद्घाटन भारताचे  खासदार श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन श्री. यांनी केले, तर स्वागतपर भाषण व आभार श्री. महेश कोरगावकर यांनी मानले. यावेळी श्री. सदानंद शेट तानावडे, या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री. शिवशंकर मयेकर यांची समयोचित भाषणे झाली.

Trending

Exit mobile version