गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना विशूच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: केरळ बांधवांना विशूच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, विशु हा केरळातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि तो हिंदू मल्याळी लोक साजरा करतात. या सणाने पारंपारिक नव्या वर्षाची सुरुवात होते. हा सण धार्मिक विधी आणि रीतिरिवाजांसह साजरा केला जातो. या सणात पाळल्या जाणाऱ्या पारंपारिक विधी समृद्धीचे आणखी एक वर्ष घेऊन येते. हा सण लोकांमध्ये मैत्री आणि परस्पर समंजसपणाची नवी भावना निर्माण करतो आणि आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना एक नवीन अर्थ देतो.

     या वर्षाचा विशू सण आपण सर्वांसाठी अधिक आनंद आणि भरभराट घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Trending

Exit mobile version