गोवा खबर

ऊर्जेचे संवर्धन आणि योग्य वापर करणे आवश्यक : ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यातील सहा तालुक्यातील ६५० अंगणवाड्यांना इंडक्शन कुकटॉपचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना वीज खाते  गोवा ऊर्जा विकास संस्थेसोबत छतावरील सौर यंत्रणेसाठी प्रोत्साहन आणि बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान यासह विविध योजनांद्वारे स्वच्छ स्वयंपाकास प्रोत्साहन देत आहे असे सांगितले.

गोवा विनामुल्य वीज योजना आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसीसारख्या उपक्रमांद्वारे राज्य इलेक्ट्रिक स्वयंपाकाकडे वळण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे असेही त्यांनी सांगितले.

आज ऊर्जा कार्यक्षमता कीर्यालयाच्या सहकार्याने वीज खात्याने पर्वरी येथील सचिवालयाच्या परिषदगृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मंत्र्यांनी ऊर्जेचे स्रोत महत्त्वाचे आहे आणि त्यांचे संवर्धन आणि योग्य वापर करणे आवश्यक आहे असे सांगितले.  स्वच्छ स्वयंपाक कार्यक्रमाच्या प्रचाराअंतर्गत इंडक्शन कुकटॉप्स देण्यात आले.

सत्तरी, डिचोली, बार्देश, फोंडा, सासस्टी आणि केपे या सहा तालुक्यांतील अंगणवाड्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढील टप्प्यात इतर तालुक्यातील उर्वरित अंगणवाड्या या योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या जातील.

या कार्यक्रमाला राज्य नियुक्त एजन्सीचे नोडल अधिकारी आणि विद्युत खात्याचे अधिक्षक अभियंता श्री मयूर हेदे, सीडीपीओ, मुख्यसेविका आणि इतर उपस्थित होते.

 सुरवातीस अधिक्षक अभियंता वाणिज्य शैलेश बुर्ये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सहाय्यक अभियंता मेघा नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यकारी अभियंता राजीव नाईक यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version