गोवा खबर

उत्सव गोव्याच्या काजू परंपरेचा आणि संस्कृतीचा

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो गोवा काजू महोत्सव २०२५ – सिझन ३ पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय!

काजू ह्या गोव्याची ओळख समजली जाणाऱ्या फळाला केंद्रास्तानी ठेवून बनलेल्या निरनिराळ्या चविष्ट पदार्थांना साजरा करणारा एक अविस्मरणीय सोहळा २५, २६ आणि २७ एप्रिल रोजी डी.बी. मैदान, पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा महोत्सव डॉ. देविया राणे, अध्यक्षा, गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GFDC) यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. गोवा काजू महोत्सवाला अप्रतिम मांडणी आणि शैलीमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव म्हणून मान्यता मिळाली आहे. गोव्यातील काजू लागवडीचा समृद्ध वारसा, काजू उत्पादकांचे योगदान, काजूपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचे दर्शन आणि गोव्याच्या संस्कृतीशी असलेले या पीकाचे नाते याचे दर्शन या उत्सवात घडते.

या वर्षीचा महोत्सव अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे, ज्यामध्ये समाविष्ट आहे:
• सुंदर संध्याकाळी सजलेला Sundowner सेट
• फॅशन शो
• ५० हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल
• नामवंत कलाकारांचे लाईव्ह परफॉर्मन्स
• मजेदार खेळ, स्पॉट प्राईजेस आणि बरेच काही!
प्रवेश पूर्णपणे मोफत राहील!

डॉ. देविया राणे यांच्या मते गोवा काजू महोत्सव हा केवळ एक उत्सव नाही – तो गोव्याच्या काजू परंपरेला वाहिलेली एक आदरांजली आहे.
हा महोत्सव गोव्याच्या शेतकऱ्यांप्रती, स्वयं-सहायता गटांप्रती आणि काजू उत्पादनांच्या क्षेत्राशी निगडित सर्व उद्योजक व कर्मचाऱ्यांप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

ह्या वर्षीची थीम –Explore. Empower. Enrich. – हे या उत्सवाचे ध्येय आहे. सिझन 3 एक खास अनुभूती ठरणार असून, खाद्य
पदार्थ, पाककृती, संगीत, फॅशन आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण समुदाय
एकत्र आणणारा आहे.

Trending

Exit mobile version