गोवा खबर

तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्रांची वरद फार्मला भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : धारबांदोडा येथील तरुण प्रगतीशील शेतकरी वरद सामंत यांनी राज्यातील कृषी क्षेत्र ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात तसेच आर्थिक विकासाला चालना देते असे मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार, स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्रांनी धारबांदोडा येथील श्री वरद सामंत फार्मला भेट दिली आणि श्री सामंत यांनी त्यांच्या शेतात वापरलेल्या शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. यामुळे इतर शेतकऱ्यांना माहिती होण्यास आणि शेती व्यवसाय वाढविण्यासाठी मदत होईल.

वरद सामंत यांनी त्यांच्या शेतीविषयक  माहिती दिली आणि त्यांच्या शेतात वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविले. शेतीचे महत्त्व सांगताना सामंत यांनी शेती ही मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ असून जगण्यासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे साधन आहे असे सांगितले. शेतीमुळे उपजीविकेला आणि आर्थिक विकासाला चालना मिळते असेही त्यांनी सांगितले.

सुरवातीस सामंत यांचा तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्रांच्यावतीने वासुदेव शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Trending

Exit mobile version