गोवा खबर : गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उध्योजकता संचालनालयाने १६ एप्रिल रोजी उत्तर गोव्यातील डिचोली येथील सरकारी औध्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी ९ वाजल्यापासून प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन केले आहे. अप्रेंटीसशीप मेळाव्यात अनेक सार्वजनिक आणि खाजगी अस्थापने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
इच्छुक आयटीआय उमेदवारांनी आणि इतर स्थानिक युवकांनी नावनोंदणी आणि आपले भविष्य घडविण्यासाठी या संधीचा लाभ घेण्यासाठी सकाळी ९ वाजता मेळाव्याच्या ठिकाणी हजर रहावे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सरकारी औध्योगिक प्रशिक्षण संस्था, डिचोली, दूरध्वनी क्रं ०८३२-२३६२३१५, ७०२००५३०५२ वर संपर्क साधावा.