गोवा खबर

कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून विक्रमी उत्पादन आणि पुरवठ्याचा कोळसा मंत्रालयाचा अहवाल

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोळसा मंत्रालयाने 2024-25 या आर्थिक वर्षात कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून कोळसा उत्पादन आणि पुरवठ्यात नवीन विक्रम प्रस्थापित करत एक ऐतिहासिक यश मिळवले आहे. मागील वर्षीच्या 147.11 मेट्रिक टनपेक्षा 29.79% लक्षणीय वाढ नोंदवत 31 मार्च 2025 पर्यंत एकूण कोळसा उत्पादन 190.95 दशलक्ष टन (एमटी) पर्यंत वाढले आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नोंदवलेल्या 142.79 मेट्रिक टनपेक्षा 33.36% वाढ नोंदवत कोळशाच्या पुरवठ्यातही 190.42 मेट्रिक टनपर्यंत अभूतपूर्व वृद्धी झाली.

कॅप्टिव्ह खाणींनी मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 24.72% आणि पुरवठ्यात 27.76% वाढ साध्य केली, ज्यामुळे मुख्य उद्योगांना स्थिर पुरवठा सुनिश्चित झाला. व्यावसायिक खाणींनी ही गती राखत, उत्पादनात 67.32% वाढ नोंदवली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरवठ्यात 76.71% वृद्धी नोंदवली.

हे विक्रमी यश भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या धोरणात्मक प्रयत्नांचे मूर्त स्वरूप असून याद्वारे जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून देशाचे स्थान मजबूत होते.

Trending

Exit mobile version