गोवा खबर

बीएसएनएलच्या वतीने एप्रिल 2025 या ग्राहक सेवा महिन्याचा प्रारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतातील आघाडीची सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या वतीने एप्रिल 2025 हा महिना  ग्राहक सेवा महिना म्हणून घोषित केला आहे. आत्मियतेची जोडणी (Connecting with Car) अशी या देशव्यापी उपक्रमाची संकल्पना असणार आहे. ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवेचा वाढता अनुभव देणे आणि आपल्या सेवा वापरकर्त्यांशी दृढ संबंध निर्माण करणे हा या  मोहीमेचा उद्देश आहे.

बीएसएनएलची सर्व मंडळे, व्यवसाय क्षेत्रे आणि युनिट्स या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होतील.ग्रामीण, शहरी, उपक्रम आणि किरकोळ अशा सर्वच विभागांतील ग्राहकांशी नव्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत केला जाईल. याअंतर्गत खाली नमूद केलेल्या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे :

  • मोबाइल नेटवर्कची गुणवत्ता सुधारणे
  • एफटीटीएच (FTTH) आणि ब्रॉडबँडची विश्वासार्हता वाढवणे
  • लीस्ड सर्किट/एमपीएलएस (MPLS) ची विश्वासार्हता वाढवणे
  • देयक प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे
  • ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे

या सेवा महिन्यात, बीएसएनएल आपले संकेतस्थळ, समाज माध्यमे, ग्राहकांसाठेचे  समर्पित अर्ज आणि थेट संपर्क यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांचा वापर करून सक्रियपणे अभिप्राय संकलीत करेल. विशेष म्हणजे, हे सर्व अभिप्राय बीएसएनएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) कार्यालयाकडून (Office of the Chairman and Managing Director – CMD) एकत्रित करून त्याचा थेट आढावाही घेतला जाणार आहे.

Trending

Exit mobile version