गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना गुढी पाडव्याच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, गुढी पाडव्याच्या शुभ प्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या शुभ दिनी पारंपारिक नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
गुढी पाडवा हा सण आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या विधींसह मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि त्याला उगादी, युगाढी, संसार पाडवा, छटीचांद इत्यादी विविध नावांनी ओळखला जातो. गुढी पाडव्याच्या सणाने नवीन वर्षाच्या प्रारंभ होतो. या शुभ प्रसंगी लोक त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांना उजाळा देतात आणि समाजात चांगल्या, अधिक फळदायी आणि निरोगी जीवनासाठी स्वतःला पुर्नसमर्पित होतात.
“या वर्षीचा गुढी पाडवा उगाढी, युगाढी छटीचांद उत्सव सर्वांना अपार आनंद आणि समृद्धी घेऊन येवो” असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.